प्रवास हंपीचा "covid विशेष "

 मराठी मध्ये ब्लॉग लिहिण्याचा हा माझा पहिला प्रयत्न , आशा आहे तुम्हाला वाचायला आवडेल ... 

Golden Chariot : Hampi

खूप वर्ष मला "हंपी" ला जायचं होत पण काही वेळा कामामुळे अथवा इतर काही कारणांनी जमत नव्हते . LOCKDOWN नंतर जेंव्हा कुठे जाण्याचा विचार चालू झाला, तेंव्हा सर्वप्रथम "हंपी" हे नाव माझ्या मनात आले आणि सगळे योग् अगदी छान जुळून येऊन आमचं हंपी येथे (१९ फेब २०२१ )पदार्पण झाले. 

मी आणि माझी फॅमिली; ज्यात मी माझा नवरा आणि ८ वर्षाची मुलगी हे येतात, आमचा प्रवास आमच्या CAR ने खारघर येथून सकाळी ७ वाजता चालू झाला. हंपी येथे आम्ही आधीच "क्लार्क इन्" हॉटेल ONLINE ५ दिवसांसाठी BOOK केले होते. प्रवासाबद्दल बोलायचे तर, खारघर, नवी मुंबई ते हुबळी फाट्यापर्यंत रास्ता चांगला आहे पण त्यापुढे फार वेळ वाया जातो , छोट्या रस्त्यामुळे आणि आपल्या येथील लोकल ट्रॅफिक मुळे वेळ वाया जातो. आम्ही साधारण रात्री ९:३० ला हॉटेल वर पोहोचलो. 

पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, ऑनलाईन बुकिंग मध्ये आमचे प्रति रात्री १००० रुपये वाया गेले होते . TIP : ऑफ SEASON ला हॉटेल ला फोने करून प्रति रात्री चा दर ठरवून व पडताळून घेतला तर बचत होते. आम्हाला हॉटेल ४००० प्रति रात्री ने मिळाले होते ज्यात फक्त सकाळची न्याहारी समाविष्ट होती. येथे राहण्या साठी बरेचसे विकल्प आहेत अगदी ७०० ते ४००० पर्यंत चे ऑपशन्स आहेत, आपल्या सोयी नुसार आपण आपला विकल्प ठरवू शकतो.

हंपी हे ठिकाण असे आहे; जे तुम्ही गाईड सोबत पाहण्या सारखे आहे. लोकल गाईड आपल्याला साधारण १००० ते २००० रुपये प्रति दिवस मध्ये मिळून जातात. पण आपण काय पाहायचं आहे आणि किती वेळात पाहायचं आहे हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. त्याप्रमाणे गाईड आपले चार्जेस ठरवत असतो. 

Hampi Map


साधारण २ पूर्ण दिवस हे हंपी पाहण्यासाठी पुरेसे ठरतात, कारण सर्व उत्खनने अगदी जवळ जवळ आहेत. व्यवस्तीत नियोजन केले तर अगदी आरामशीर सर्व पाहून होऊ शकते. 

आम्ही तर याखेरीज जवळच असलेले देव हनुमान यांचे जन्मस्थान "अंजनेद्री" , "दारोजी स्लॉथ बेअर सँक्चुरी" , "सोनापूर तलाव" आणि "अनेगुंडी" नावाचे एक सुंदर नयनरम्य असे गाव हे देखील फिरलो. आम्ही गाडी ने गेल्याचे हे फायदे होते कि वेळेचे निर्बंध अगदी नव्हते. 

हंपी हे साधारण सायंकाळी ५ नंतर बंद होते म्हणून आम्ही कमालपूर येथे आमचे हॉटेल होते तिथेच रात्री चे जेवण घ्यायचो. दक्षिणी जेवणाचे ऑपशन्स बरेच आहेत पण ते अगदी छोट्या प्रमाणात चालणाऱ्या खाणावळ्या म्हणू शकतो. बैठी बस्तान टाकलेल्या या खाणावळ्या उत्कृष्ट आणि चविष्ट जेवण अगदी माफक दारात पोटभर देतात. अगदी २०० रुपये प्रति माणूस ने हे जेवण उपलब्ध असते ते देखील कितीही वेळा तुम्ही पुन्हा घेऊ शकता. संदर्भ द्यायचा तर कमालपूर येथील "ग्रीन रेस्टॉरंट". आणि जेवणाचा मेनू देखील रोज वेगळा असतो. 

हंपी हे दोन विभागात वाटले गेले आहे , १ हेरिटेज बाजू आणि २ हिप्पी लोकांनी उपजलेली बाजू , यात सध्या तरी हिप्पी ISLAND पूर्णतः बंद आहे सध्याच्या COVID प्रादुर्भावामुळे . तसेच CORACLE देखील बंदच आहेत. आणि COVID बद्दल जे सरकारी नियम आहेत ते आपण इथेही पाळावे लागतात. येताना कुठेही PCR टेस्ट वैगरे लागली नाही तसे तेंव्हा निर्बंध नव्हते. पर्यटक देखील कमीच असल्याने सर्व ठिकाणे अगदी छान  पाहता आली.


काय पाहण्या सारखे आहे ?

  • दिवस पहिला 

सध्या आपण हेरिटेज बाजूचे पॉईंट्स क्रमश कसे करावे ते पाहू. सकाळची सुरुवात आपण सर्वप्रथम मातंगा हिल ने करू शकतो. पण हि चढ चढायची असेल तर सोबत पाण्याची पुरेशी मोठी बाटली आणि स्पोर्ट SHOES असलेले बरे. सकाळी ५:३० ला आपण चढायला सुरु केलं तर साधारण ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागतो. सकाळचा प्रहर क्लाइंबिंग साठी उत्कृष्ट ठरतो व सूर्योदयाचे सुंदर दर्शन येथून होऊ शकते. 

Matanga Hill

तेथून उतरताच समोरच श्री विरुपक्ष देवस्थान आहे . गाभाऱ्यात अजूनही पूजा-अभिषेक होतात. सभा मंडप आणि त्याचे छत पाहण्यासारखे आहे. जुन्या काळात वापरले गेलेले नैसर्गिक रंग अजूनही खुलून दिसतात, आणि चित्ररूपात वर्णन केलेल्या कथांबद्दल तर मी काय बोलू. अप्रतिम कलाकृती पाहून मी थक्कच झालेले.हे देऊळ सातव्या शतकात बांधले आहे. किती पिढ्या पहिल्या असाव्यात या देवळाच्या भिंतींनी विचार करूनच अंगावर रोमांच येतात. येथेच तुम्ही भेटू शकता "लक्ष्मी" हत्तीणीला. तिच्यासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी १० रुपयाची केळी घेण्यास विसरू नका पण माकडांपासून सावधान! 

Virupaksha Temple
 

विरुपक्ष देवळाच्या मागच्या बाजूने हिप्पी बेटावर जाण्यासाठी फेरी बोट चालते (जी सध्या बंद आहे ) तेथून तुम्ही हिप्पी लँड ला जाऊ शकता. 

Hippie Island

मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला छोटी वसाहत लागेल तिथे छान छोटेखानी उपहार गृह आहेत जिथे तुम्ही न्याहारी करू शकता. संदर्भ द्यायचा तर तेथे जेवणासाठी प्रसिद्ध असे मँगो ट्री रेस्टॉरंट आणि गोपी गेस्ट हाऊस रुफटॉप रेस्टॉरंट आहेत. एकंदर बैठक आणि सजावट फार वेगळी आहे येथे. 

.    
 

तेथून पुढे तुम्ही उत्साही असाल तर हेमकूट टेकडी चढून वरून दिसणारे सुंदर नजारे पहा, सासिवेकलू गणेश पहा ;  किंवा गाडी काढून पुढे मस्टर्ड गणेश, श्री कृष्ण मंदिर व समोरच असलेलं कृष्ण बाजार पाहून घ्या , सोबत जर गाईड असेल तर उत्तमच कारण तो तुम्हाला या स्थानांशी संबंधित बरीच माहिती देत जातो. 

 


दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात तुम्ही पुढे लक्ष्मी नरसिंव्ह , बडवी लिन्ग या दोन स्थळांना वाटेत भेट द्या. हि दिनही स्थळे अगदी बाजू-बाजूस आहेत. लक्ष्मी नरसिंव्ह ची मूर्ती विस्थापित आहे व भग्न अवस्थेत असूनही तीच सौंदर्य अजूनही झळाळून येते, या साठी मला उत्खनन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाहवाह करावीच लागेल. 

.      

प्रचलित कथे अनुसार, पूर्वीच्या शतकात "वैश्य" जे विष्णू भगवान यांना मनात व "शैव्य" जे भगवान शिव ला मनात, असे दोन वर्ग होते. या दोघांत कोणाचा देव श्रेष्ठ असे वाद असत, या वादांचे रूपांतर लढायांमध्ये झाले आणि हेच कारण आहे इथे शैव्य लोकांनी विष्णूजींच्या मंदिरांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले आहे. जेंव्हा कि शिव मंदिरे शाबूत आहेत. दुसते कारण हे असू शकते कि जेंव्हा परकीय लढाया होत तेंव्हा आक्रमक प्रचंड नासधूस करत आणि सोन्याच्या हव्यासापायी मुर्त्या आणि मंदिरांचे नुकसान करत. हे हि एक कारण आहे मंदीरे भग्न अवस्थेत असण्याचे. 

आम्ही संध्याकाळी "मालयावंत रघुनाथ मंदिर " ला भेट दिली. थोडीशी चढ चढल्यावर मागच्या बाजूने उत्तम सूर्यास्त दर्शन होते , विशेष म्हणजे मराठी "हंपी" नावाचा चित्रपट जर तुम्ही पहिला असेल तर त्यात हे ठिकाण तुम्ही जरूर पहिले असेल. तसे तर बरेच भाग या चित्रपटात त्यांनी उत्तम रित्या दाखवले आहेत. 

बाकी ठिकाणे आपण दुसऱ्या दिवसासाठी ठेवली आहे कारण वरील ठिकाणी प्रवेश मोफत आहे आणि बाकी ठिकाणे हे आपण १ दिवसाची ४० रुपयाची तिकीट काढून १ दिवसात पाहू शकतो , यासाठी पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी आपण एखाद्या टेकडीवरून सुर्यास्थ पाहण्याचा आनंद घेऊन हॉटेल वर परंतु शकतो 

रात्री साठी जर काही प्लॅन करायचा झाला तर तुंगभद्रा नदीच्या धरणा जवळ सुंदर LIGHT SHOW चालतो तो पाहू शकता


तर आता पाहूया पहिल्या दिवशी आपण काय पाहू शकतो लिस्ट फॉर्म मध्ये 

  • दिवस पहिला 

१ मातंग हिल 

२ विरुपक्ष मंदिर 

३ हेमकूट हिल 

४ सासिवेकलू गणेश 

५ मस्टर्ड गणेशा 

५ श्री कृष्ण मंदिर 

६ श्री कृष्ण बाजार 

७ लक्ष्मी नरसिंव्ह

८ बडवी लिन्ग

९ सूर्यास्त दर्शन 

१० तुंगभद्रा धरण (ऑपशनल)

दिवस दुसरा 

आजच्या दिवशी आपण राहिलेली व महत्वाची अशी ठिकाणे पाहणार आहोत. दिवसाची सुरुवात  आपण "उंडरग्राऊंड शिव टेम्पल " ने करू शकतो. हे देऊळ सकाळी ७ वाजल्यापासून पर्यटकांसाठी खुले होते. याचे वैशिष्ट्य  म्हणजे हे १४ व्या शतकातील असून हे जेंव्हा उत्खनन विभागाला मिळाले तेंव्हा याचा अगदी कळस दिसत होता. त्या कळसावरून उत्खनन विभागाने हे मंदिर जमिनीतून शोधून काढले. हि सर्व माहिती आपणास हंपी येथे असलेल्या archeological museum मध्ये चित्र व माहिती रूपात दिसते. या नंतर आपण Royal Enclosure येथे १ दिवसाचा हंपी चा एन्ट्री पास काढून बाकीची ठिकाणे पाहून घेऊ शकतो. हि तिकीट ४० रुपये एवढी प्रति प्रौढ आहे. 

Underground Shiva Temple

Royal Enclosure येथे प्रवेश केल्यावर आपण थेट मागच्या points  पासून सुरु करून पुढे आलो तर बर पडते. प्रथम आपण "लोटस महाल" पाहू.  लोटस महाल हा राजाच्या राण्यांकरिता खास बांधला गेला होता. याचा उपयोग त्या उन्हाळ्यात खास करत असाव्यात. या महालाची बांधणी अशी काही आहे ज्याने या महालात प्रचंड उकाड्याच्या दिवसात देखील गारवा आबादित ठेवता येत होता. या मध्ये पाणी साठवण्याची विशेष सोय आहे तसेच भिंती या चुन्याच्या असल्या कारणाने नैसर्गिक रित्या पाणी शोषून घेऊन महालाचा अंतर्गत भाग थंड ठेवीत होत्या. आता कुणालाही महालात प्रवेश नाही आपण फक्त खालचा परिसर पाहू शकतो. 

lotus mahal
 

याच्याच मागे थेट गेलो कि प्रचंड सुंदर व रेखीव अशी शाही हत्तीसाठी बांधलेली एक इमारत दिसते "ELEPHANT STABLE" . हा भाग गव्हर्मेंट ने छान सोशोभित करून ठेवला आहे. मागे एक छोटे देऊळ आहे. याच आवारात "zanana enclosure" आहे. पुढे आपण पण सुपारी बाजार पाहून हजार राम देवळात प्रवेश करतो.  

Elephants Stable 


hazara rama temple

"हजार रामा टेम्पल" येथे संपूर्ण रामायण आपल्याला कोरीव कामात सुबकतेने रेखाटलेले पाहायला मिळते. या देवळाच्या ३ प्रदक्षिणा करता रामायण पूर्ण होते. अद्भुत अशी कलाकृती आपणास येथे दिसून येते याच बरोबर आपले पूर्वज किती परिपूर्ण होते याची जाणीव देखील खोल होत जाते. 

pushkarni


तेथून पुढे आपणास पूर्वीच्या जमान्यातील राजपाठ यांचे अवशेष मिळतात , पुढेच एक सुंदर विहीर आहे. हो विहीर विषम शिडया वापरून बांधली गेलेली दिसते. विहिरीच्या बाजूला पाण्याचे संगोपन करण्याकरिता पाट बांधलेला दिसून येतो. अजून नीट पाहाल तर या पाटबंधाऱ्यावर जेवणाचे ताट आणि वाट्या कोरलेल्या आहेत. आमच्या गाईड ने दिलेल्या माहिती नुसार अश्या बंधाऱ्यांवर सैनिक जेवणास बसायचे. येथे पूर्वीच्या काळातील मातीने बनवलेली पाईप लाईन देखील पाहता येते. 

royal enclosure 
 

queens bath
पुढे आपणास राण्यांसाठी बांधलेले खास शयनघर पाहू. या QUEENS BATH मध्ये खास मसाज कक्ष देखील दिसून येतात. पाणी येण्या जाण्यासाठी देखील उत्तम व्यवस्था होती हे लक्षात येते. एकंदर आपले पूर्वज शेकडो शतकापूर्वी देखील विचारांनी व ज्ञानाने किती प्रगल्भ होते हे दिसून येते. 

हा आवार  पूर्ण पाहण्यासाठी पुरेसा वेळ लागतो , साधारण दुपार होतेच तेंव्हा आता जेवणाच्या ब्रेक नंतर पुढचा कार्यक्रव ठरवता येतो . दुपारच्या गर्मी च्या वेळात एक धावती भेट संग्रहालयाला देऊन ४ च्या सुमारास पुढे विजय विठ्ठल मंदिराचा आवार आपण पाहायला घेऊ शकतो 

VIJAY VITTHALA TEMPLE

   "विजय विठ्ठल मंदिर" हि एक सुंदर कलाकृती आहे, येथील मुसिकल पिलर्स खूप प्रसिद्ध आहेत याच प्रमाणे आपल्या ५० रुपयाच्या नोटीवर असलेल्या रथाचे (STONE CHARIOT) दर्शन येथे होते. 

STONE CHARIOT


   खूप साऱ्या चित्रपटात पाहिलेल्या त्या उजाड वृक्षाचे (चाफ्याचे झाड ) स्थान ते हेच. 

   या खेरीज आम्ही केलेली इतर ठिकाणे करायची झाल्यास अजून १/२ दिवस हवेत. 

   कारण श्री हनुमानजींचे जन्मस्थळ "अंजनेद्री" बऱ्यापैकी लांब असून त्याला ५७५ पायऱ्या आहेत . डोंगरावरून खूप विलोभनीय दृश्य दिसते ते वेगळेच."सोनापूर तलाव" याच रस्त्याने पुढे लागते. तलावाच्या जवळ मी काही CORACLE उभ्या पहिल्या पण त्या देखील परवानगी नसल्याने बंद होत्या. "दारोजी स्लॉथ बेअर सँक्चुरी" हि एका बाजूला असून तिला अर्धा दिवस द्यावा लागतो आणि जाऊनही जंगली प्राणी दिसतीलच असे नाही. बरे एंर्टी फी पण ५०० प्रति गाडी आहे. 

CHANDRASHEKHARA TEMPLE , OCTAGONAL BATH हे कोण्या एका दिवशी वेळ असेल तर पाहता येते 

आता पॉईंट्स मध्ये दुसऱ्यादिवशी काय पाहायचे ते पाहू 

  • दिवस दुसरा 

  1. उंडरग्राऊंड शिव टेम्पल
  2. लोटस महाल
  3. एलिफन्ट स्टेबल 
  4. राणी महाल / ZANANA ENCLOSURE 
  5. पान सुपारी बाजार 
  6. हजार रामा मंदिर 
  7. रॉयल एन्क्लोसर 
  8. पुष्करणी
  9. QUEENS BATH 
  10. ARCHEOLOGICAL MUSEUM 
  11. विजय विठ्ठल मंदिर 
  12. स्टोन CHARIOT 
  13. किंग्स बॅलन्स 
  14. पौराणिक मंडप 


inserting some interesting pictures for your reference

  

  

sanapur lake
 













Comments

  1. Very good post. Highly informative for travellers who want to visit Hampi. Nicely written. Keep up the good work.

    ReplyDelete

Post a Comment

I WELCOME ALL READER TO COMMENT :) let's grow together.